माझे मलाच
माझे मलाच
एक वाटी चुकली
ना दिशाही दिसली,
सावली हसली माझी मलाच.....
कुठे जावे कळेना अंधकार सरता सरेना
काळोखात मी दिसेना माझे मलाच.....
सारे काळीज फाटले दुःख मनी दाटले का?
हा घाव मी दिला माझे मलाच.....
जितके सावरण्या गेलो तितके विखरून गेले का मी सावराया गेलो कळेना माझे मलाच...
जन्मा आलो काय माझा गुन्हा संपवावे वाटते मीच माझे मलाच...
