मी पैसा बोलतोय—(भाग-१)
मी पैसा बोलतोय—(भाग-१)
मी मीठा सारखा आहे,
जरुरत आहे परंतु गरजेपेक्षा जास्त झाला
तर जीवनाचा स्वाद बिघडवतो.
मी देव नाही,
परंतु लोक मला देव मानतात आणि कुलुपात बंद करतात
मी स्वतः सैतान नाही,
परंतु लोक माझ्या मुळे गुन्हा करतात आणि सैतान बनतात.
मी कोणी दुसरी तिसरी व्यक्ती नाही,
परंतु माझ्यामुळे लोक एकमेकांपासून दूर जातात.
मी कोणासाठी कधीही बलिदान केले नाही,
परंतु माझ्यामुळे लोक जीव देतात.
मी सर्वच गोष्टींचे मूळ आहे,
परंतु तरी सुद्धा लोक माझ्या पाठीमागे लागतात.
सर्व जण मलाच पंसद करतात,
परंतु बाकी सर्वाना नापंसद करतात.
मी काहीच नाही,
परंतु बरेच काही करतो... जेणेकरून लोक तुम्हाला इज्जत देतात.
मी पैसा आहे परंतु मी स्वतः बोलत नाही,
परंतु एकमेकांची तोंड मात्र बंद करू शकतो.
मला तुम्ही मेल्यानंतर वर घेऊन जाऊ शकत नाही,
परंतु जीवनात मी तुम्हाला बरेच वर घेऊन जाऊ शकतो.
मी नवीन नाती जोडतो,
परंतु जुनी नाती बिघडवतो सुद्धा.
मी तुमच्यासाठी सर्व काही खरेदी करून देऊ शकतो,
परंतु तुमचे आयुष्य नाही वाढवू शकत.
मी गरिबांसाठी आणि श्रीमंतांसाठी सर्वसामान आहे,
परंतु माझ्यामुळे लोकांचे जीव जातातही आणि जीव वाचतातही.
माझी एकच भाषा बोलते,
आज तू मला वाचव उद्या तू मी तुला वाचवील.
माझ्यामुळे गरीब आणि श्रीमंत यातील दरी वाढते,
परंतु याला मी जबाबदार नाही.
