STORYMIRROR

BABAJI HULE

Others

4  

BABAJI HULE

Others

बाप कधी थांबतच नाही ---

बाप कधी थांबतच नाही ---

1 min
220

लेकरांच कायदेशीर पालकत्व घेणारा 

आपल्याच कुटूंबाच अस्तित्व जपणारा 

स्वाभिमानाची जिद्द आणि अती काबाडकष्ट 

समाजाची बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठ

हे कधीच आयुष्यात न सोडणारा, बाप कधी थांबत नाही ---

 

कुटुंबावरील प्रेम आणि जबाबदारी याच उत्तर 

कष्टाची ताकद आणि नेटक्या स्वप्नांचे डोंगर

देवावरील श्रद्धा पण शरीराची हेळसांड करणारा 

तुटलेल्या कौलारु छताला कागदाने सांधणारा 

पावसाच्या डबक्यांना ओंजळीने भरणारा, बाप कधी थांबतच नाही ---

 

मुलांप्रमाणे जनावरांना वेळेवर घास भरविणारा 

उन्हा पावसात जनावरांच छप्पर जोपासणारा 

सणावारांना लेकरा-वासरांना मायेनं संभाळणारा 

गायीम्हशींच्या हंबरड्याला आपल्या स्पर्शाने शांत करणारा 

त्यांच्या नजरेतील भाव जपणारा, बाप कधी थांबतच नाही ---

 

वयापरत्वे गुडघ्याच्या वाढलेल्या अति वेदना 

शरीराची मंदावलेली चाल आणि कमी झालेल्या संवेदना 

अंगणातला पालापाचोळाही डोळ्यांना बघवत नाही 

उघड शेत बघून आजही मन शांत बसू देत नाही 

मांडीने पुढं सरकत शेतीची निगा राखणारा, बाप कधी थांबतच नाही ---

 

वेदनाशामक औषधांचा मारा रोज असतो शरीराला 

उठता बसता पूर्व आयुष्याच्या आठवणींचा रोजच् उजाळा 

डोळ्यांसमोर मुलांचे भरगच्च संसार दिसूनही 

काही स्वप्नांची पूर्ती तर काहींचा ध्यास अजूनही 

उरलेल्या भविष्याचे आडाखे बांधताना, बाप कधी थांबतच नाही ---


Rate this content
Log in