STORYMIRROR

BABAJI HULE

Abstract

4  

BABAJI HULE

Abstract

स्वतंत्र भारताची संकल्पना

स्वतंत्र भारताची संकल्पना

1 min
210

देश माझा असा हवाय 

जिथे असेल एकच जात 

नको कोणताही धर्मभेद 

असेल फक्त अखंड भारत  II

 

वाढलेली विषमता व्हावी कमी 

समानता यावी जनमाणसात 

श्रीमंती आणि गरिबीतले अंतर 

येऊ देईना देशाला पुढे जगात  II

 

अन्यायाला नसावा थारा 

न्यायाची असावी एक धार 

भ्रष्टाचाराला बसावी खीळ 

भेदभाव ही होतील हद्दपार  II

 

राष्ट्रभक्ती असावी प्रत्येकाच्या मनात 

त्याला मिळावी देशभक्तीची जोड 

स्मरण करावे त्या देशभक्तांना 

ज्यांच्या कार्याने स्वातंत्र्य मिळाले गोड  II

 

स्वप्नांसाठी बलिदान दिले त्यांनी 

आठवण ठेवा या क्रांतिकारकांची 

चाड असायलाच हवी राष्ट्रप्रेमाची 

बंधन पाळूयात या स्वातंत्र्याची  II

 

आणावी समानता प्रत्येक क्षेत्रांत 

बदलावी लोकशाहीची समाजरचना 

तिलांजली द्यावी साऱ्या आरक्षणाला 

साकारु स्वतंत्र भारताची संकल्पना  II


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract