Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

BABAJI HULE

Others

3  

BABAJI HULE

Others

आत्मकथन वटवृक्षाचे

आत्मकथन वटवृक्षाचे

1 min
251


आज वटपौर्णिमा, हो मी वटवृक्ष बोलतोय,

माझी व्यथा मी मांडतोय, हो मी वटवृक्षच बोलतोय  II धृ II

हजारो वर्षाचे आयुष्य माझे तुमच्या साक्षीला

एवढे मोठे जीवन तेही एकही फळ न देणाऱ्या झाडाला

माहित नाही ऋषीमुनीचें काय होते प्रयोजन


सती सावित्रीच्या महात्म्याने होतेय माझे पूजन  II१ II

विनाकारण बाकीचे वृक्ष रागावलेत माझ्यावर

वर्षांतला एक दिवस, सर्व महिला करतात माझा आदर

परंतु या जेष्टपूर्णिमेच्या निमित्ताने तोडतात माझ्या फ़ांद्या

करतात मला घायाळ, पूजेच्या नावाखाली होतो धंदा II२ II


तासातासाला भरभरून प्राणवायू देणारे आम्ही सर्व झाडे निराश झालोय रे

उन्हापावसात सावलीची साथ देऊन सुद्धा तुम्ही का निष्टुर होताय रे

सर्वकाही ठीक आहे हो, पण नका तोडातोडी करू कोणा वृक्षाची

प्राणवायूसाठी हजारोंनी जीव गमावला हि कहानी कोरोनाच्या साथीची  II३ II


माझे नाव दुसरे अक्षय, ज्याचा होत नाही क्षय लवकर

लोंबणाऱ्या पारंब्या माझ्या जाऊन जमिनीत करतात मोठा विस्तार

पतिराजाच्या प्राणा साठी लढली होती सावित्री माझ्या छायेत

सौभाग्याच्या दीर्घयुष्यासाठी आज महिलांची पूजा असते मायेत II४ II


आज घ्या एक प्रतिज्ञा, कमीत कमी लावा एक झाड वर्षाला

वड, पिपंळ,आंबा, लींबू, बाभूळ चालेल काहीही,उभे राहू तुमच्या दिमतीला

कृत्रिम प्राणवायूपेक्षा नैसर्गिक प्राणवायू वाढविल तुमच्या आयुष्याला

वटपूर्णिमेचा वसा घ्या फांद्या तोडण्यापेक्षा विस्तारुया कुटुंबाला   II५ II


शिवाच्या जटा म्हणजे पारंब्या माझ्या, कारण शिवशंकराचे स्वरूप मी

स्वामी समर्थाचा विश्वास मी, दत्तगुरुंचा "मूळ पुरुष" ही मी

आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व माझे समजून घ्या एक वटवृक्ष म्हणून

प्राणवायूचा दाता मी श्रीमंतीलाही लाजवील मी एक संसारवृक्ष म्हणून  II६ II


Rate this content
Log in