STORYMIRROR

BABAJI HULE

Classics

3  

BABAJI HULE

Classics

नभीच्या जलधारा

नभीच्या जलधारा

1 min
203

उष्णतेच्या दाहकाने

सोलटली पुरी पाठ

नभीच्या धारांची कशी

पाहत होतो मी वाट

धगधगलेली धरणी

वळीव करील शांत

बळीराजाची तयारी

करी शेती मशागत

ढगांची मैफिल रंगे

निळ्याभोर आकाशात

आलं आभाळ भरुनी

गारांचा सडा शेतात

बरसती जलधारा

नटली ही सारी सृष्टी

गधं मातीला सुटला

मृगाची ही पुष्पवृष्टी

 

काळी धरणी पोटात

बाळसे धरू लागली

कोवळे हिरवे कोंब

जन्माला घालू लागली

झाला प्रेमाचा वर्षाव

धरती शालू नेसली

तरारली बीजांकुरे

आकाशात झेपावली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics