सलाम असे हा दातृत्वाला
सलाम असे हा दातृत्वाला


समाजाची हीच बांधिलकी
कळते समाजात राहून
सेवा असावी कशी निस्वार्थ
बघावे अन्नदान करून
निमित्त कोणतेही असावे
मनी असे भाव दातृत्वाचा
मग जाणिवेचे रुपांतर
वाढवितो बंध मित्रत्वाचा
सदैव असावे परोपकार
अंगी रुजवावी ही भावना
देणारे हात तेच नेहमीचे
याचक करी व्यक्त संवेदना
सहभाग नसावा दुर्मिळ
अशावेळी मुक्त हा संचार
दाखवे तुमची नीतिमत्ता
स्वच्छ हा अनमोल विचार
ठेवा संकुचित मनोवृत्ती
जरा बासनात गुंडाळून
नसे स्नेहाला मोल जीवनी
जाणीव कृतज्ञाता संभाळून
सलाम असे हा दातृत्वाला
स्वप्नं व्हावी साकार आपली
सदैव ऋणी असे समाज
मनोमनी प्रार्थना ही केली