ग्रंथराज ज्ञानेश्वरी
ग्रंथराज ज्ञानेश्वरी
भाद्रपद षष्टी II ज्ञानाचे भांडार II
जीवनाचे सार II लिहीतसे II
प्रवरे संगमी II भक्तीचा सागर II
प्रेमाचे आगर II ग्रंथराज II
राजा ज्ञानियांचा II असतो महान II
लिही तत्वज्ञान II ज्ञानदेवी II
प्रभावी वर्णन II असे हे सुदंर II
झाला साक्षात्कार II सर्वश्रेष्ठ II
दैवत हे संत II योगी वारकरी II
भागवत तारी II सांप्रदाय II
नाव ठेवी ग्रंथा II भावार्थ दीपिका II
रची गीताटीका II ज्ञानेश्वरी II
अध्याय अठरा II अमृत देईल II
जीव सुखावेल II वाचतसे II
भक्तीचे हे तत्व II प्रकर्षाने दिसे II
मांडलेले तसे II अधिष्ठान II
वर्णन करिती II तारे आकाशाचे II
साऱ्या या विश्वाचे II तत्वकाव्य II