Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Satish Wadekar

Classics

4  

Satish Wadekar

Classics

का न माघारी वळला

का न माघारी वळला

1 min
14.2K



का न माघारी वळला


विरहदाही हा भरत तळमळला ।

श्रीरामा सांगा का न माघारी वळला ।।


विनविले बहु आर्त स्वरांनी ।

चरण भिजविले नयनजलांनी ।

शब्द संपविले मी याचनांनी ।

कसा तरीही तुझा दयार्णव आटला ।।1।।


माझा नव्हता कधीच दावा ।

कितीदा सांगू तुजला भावा ।

मम मातेचा घातकी कावा ।

आज भरत रघुकुलाचा कलंक ठरला ।।2।।


बालपणीचा काळ आठवा ।

हात हातीचा कधी न सुटावा ।

प्राण शरीरास पुन्हा भेटावा ।

महापूर हृदयीचा नयनी दाटला ।।3।।


अचेतन सारी झाली चेतना ।

ध्यास तुमचा रातदिन मना ।

लवकरी मज येऊन भेटना ।

चतुर्दश वर्षीचा आता दुष्काळही सरला ।।4।।


अजुनि तुमची वार्ता येईना ।

माझ्या मनाची होई दैना ।

न आला तरी त्यागीन प्राणा ।

का स्नेह तुमचा मजवरील संपला ।।5।।



Rate this content
Log in