वर्षे वाया गेले
वर्षे वाया गेले
(चाल.दिल के आरमा...)
कोरोनाने या जन्माचे आमच्या वाटोळे केले..
बघता बघता वर्ष आमचे वाया गेले...
कसा आला हा जीवघेणा कोरोना
बंद झालं जगनं सारं , राहवेना
कित्येक झाले पॉझिटिव्ह नी कित्येक मेले....
साऱ्या जगाला कोरोनाची बसली भिती
नाही लस नाही इलाज न काही हाती
महामारीने या जगाचे साऱ्या वाटोळे केले....
किती जपावं घ्यावी किती खबरदारी
लई जगावर वाईट आली ही महामारी
थांबलं शिक्षण भविष्य आमचं वाया गेलं....
कशाची शाळा, कशाचं शिक्षण तमाशा झाला
काय घ्यावा निर्णय कळेना शासनाला
ऑनलाईन शिक्षणाने या साऱ्यांना वेडं केलं...
शिक्षक, विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या होती
नाही इलाज तरी फालतू नाटकं किती
टिव्ही, मोबाईल ने डोके खराब झाले...
