STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

जगा जरा सुखाने

जगा जरा सुखाने

1 min
13

मिळाला माणूस जन्म
जगा जरा सुखाने,
दुःख देऊ नका कोणा
 वागा माणुसकीने

 प्रत्येक जण येतो
 आला तसाच जातो
 येणे जाणे रिकामेच
 नाही संगे काही नेणे...

 नाही जीवाचा भरोसा
 नाही राहायला कोणी आला
, नको उगीच रे पाप
आहे सारं सोडून जाणे...

 नको कशाचाच लोभ
नाही कामाची धनदौलत,
जा संकटात धावून
 नाव घ्यावे उद्या जगाने...

 उरते काय मेल्यावर
 कर भलं जितेपणी,
हळहळतील चार जण
 येईल डोळ्यात पाणी...

 नको वाईट वागणे
 दुनिया जिंकावी प्रेमाने,
 पैसा नाही सर्व काही
 नको मातू तू गर्वाने...

 आहे प्रत्येकाला मरण
याची ठेवा थोडी जाणं,
 दया,माया करा उपकार
 घडो हातून पुण्य...

 मरुण किर्ती उरावी
 व्हावा जीवाचा उद्धार,
पुण्य करा थोडं,
पाप नको मुळीच बरं 

गायकवाड आर.जी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract