STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

कोटी कोटी शुभेच्छा..

कोटी कोटी शुभेच्छा..

1 min
14

कोटी कोटी शुभेच्छा...
 दिवस आज हा आनंदाचा
 किती सर्वांना आनंद झाला,
हा आनंद द्वीगुणीत होवो
कोटी शुभेच्छा...श्रीला
जीवनास अर्थ येवो....
 पंखात बळ येवो
 झेप आकाशी उंच घेवो,
 स्वप्ने सर्वच साकार होवो
 उद्धार जीवनाचा होवो....
 ज्ञानवंत, यशवंत
गुणवंत,किर्तीवंत
 तुझ्या जयघोषाने
 दुमदुमावा आसमंत
 जगी किर्ती महान
 आदर्श तुझा राहवो....
 यश लाभो परीश्रमाला
नको सिमा तुझ्या ज्ञानाला
 पायी तुझ्या लोळन
 सर्व सुखाने घेवो...
 मात्यापित्याचे नाव
 कर कुळाचा उद्धार,
जग दिपव कर्तृत्ववाने
व्हावा दुष्टांचा संहार
 उज्वल भविष्य तुझे
जगी जयघोष होवो....
 तुझ्या ज्ञान प्रकाशाने
 जग उजळून हे जावे,
तुला वंदुनी तुझेच
गित,ओवी, पोवाडे गावे
तुझ्या इतके महान
 जगीन कोणी होवो...
 घे आशिर्वाद सर्वांचे
 मनोभावे कोटी शुभेच्छा,
 स्वप्ने साकारावी सारी
 ठेव अनंत तू इच्छा
 जग हे विशाल सारे
 मुठीत तुझ्या येवो...

गायकवाड आर.जी.दापकेकर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract