कोणी भेटतं का पुन्हा..
कोणी भेटतं का पुन्हा..
कोणी भेटतं का पुन्हा...
'. पुष्पाग्रज. '
आरे नातीगोती टिकवा
नको अबोला कुणा...
मेल्यावर सांगा कोणी
भेटतं का पुन्हा...
.
भाऊ ,बहीण, आईबाप
नाही जवळ याऊन कोणी,
कशाला दुरावा, अबोला
छोट्याशा कारणाहुणी.
सुखदुःखात होऊन एक द्या आनंद जीवना....
.... कोणी भेटतं का कुणा....
मित्र,भावकी कधी कुणाशी
थोडं जरी खटकल,
काय आहे वाईट सारं
जर ते विसरुन टाकलं.
चुकलं काय विचारुन करा माफ दुश्मना....
... कोणी भेटतं का पुन्हा....
नको गर्व कशाचा
नको घमेंड मुळी,
काळ, वेळ बदलतो
सारी दैवाची खेळी.
मोठ्या मनाने, दिलदारपणे घे समजून तू त्यांना....
... कोणी भेटतं का पुन्हा...
वाईट कोणी चितलं
केल्या लाख चुका कोणी,
जैशी करणी वैशी भरणी
भोगतील भोग त्यांनी.
लहान का रे होशील तू,राख तुझा मोठेपणा...
... कोणी भेटतं का पुन्हा...
नको रे वाटोळं ह्या अनमोल जीवनाचं,
कोणी नाही राहणार, नाही कोणी कुणाचं.
ठेव अंतःकरण साफ थोडी संवेदना...
.
... कोणी भेटतं का पुन्हा....
करतोस का पाप सांग
भल्या माणसा तू,
खोट्या बोलण्या वागण्यानं
गेलास वाया रे तू
मिळतो का सांग हा जन्म पुन्हा पुन्हा....
... कोणी भेटतं का पुन्हा ..
कोण काय नेणार संगे
सारं जिथल्या तिथं,
सोडून सारंच आहे जाणं
कमवावं नाव जीवनात
कुणासाठी कुणाच्या तरी
यावेत अश्रू नयना...
... कोणी भेटतं का पुन्हा....
कशाला माणसाचा
नको तो स्वार्थीपणा,
मिळतं का रे समाधान
उगीच लुटून कुणा.
नको भरु घडा करून पाप पुन्हा पुन्हा...
कोणी भेटतं का पुन्हा...
गायकवाड आर.जी.दापकेकर.
९८३४२९८३१५
