स्वार्थ माणसाचा..
स्वार्थ माणसाचा..
स्वार्थ माणसाचा...
'. पुष्पाग्रज '
लई आहे वाईट गुण स्वार्थ माणसाचा
स्वार्थामुळेच होतोय हैवान माणसाचा...
ज्यांचं त्यांचंच पहातोय जो तो कोणी नाही कुणाचा
माणूस कसा विसरू गेला धर्म माणसाचा...
नातीगोती संपून गेली माणसं हैवान झाली
पैशापुढे नाही राहिला माणूस माणसाचा...
ज्यांच्या त्यांचा जिथं तिथं दिसतो फक्त स्वार्थ
स्वार्थामुळे माणसांचं जीवन झाले व्यर्थ
व्यर्थ झाला वाया गेला जन्म माणसाचा...
बोलतोय एक नी वागतो एक
कोणीच नाही वागत नेक
उरला नाही भरोसा माणसाला माणसाचा...
कधी कळेल माणसाला माणुसकीचा धर्म
सोडून देईल माणूस कधी वाईट त्याचे कर्म
लईच आलाय विट या वाईट माणसाचा...
पशू समान वागतो माणूस तो कसला,
स्वार्थामळेच माणसात हैवान तो घुसला
नको व्हायला कधीच असा हैवान माणसाचा...
गायकवाड आर.जी.दापकेकर
