हैवान
हैवान
तुझं पाप पुण्य विचार तुझ्या आत्म्याला,
खरा खोटा काय तू ओळख जरा स्वतःला...
दहा तोंडे तुझी तू दुर्योधन, रावण ,
तुझा नकली चेहरा
ठाऊक आहे जगाला...
तुझ्या सारखा दुष्ट, भ्रष्ट , स्वार्थी,
न होणारं कोणी ना झाला...
बोलतोस एक नी करतोस एक,
धोकेबाज लोक म्हणती तुला...
वाईट कर्म वाईट संगत
लागला मोठा कलंक तुला...
किती जन्मला वाईट एवढा
ओझं नुसता धरतीला...
मेल्यावर तू जाशील नरकात
शाप जगाने तुला दिला...
टाळूवरचे खाल्ले तू
लोणी
तुझा पापाचा घडा भरला...
तुझी गाढवावर काढून धिंड
खेटरं मारतील लोक तुला...
काय मिरवीशी घेऊन तोंड,
काळे फासले तोंडाला...
पश्चात्ताप तुला न कसला,
काय म्हणावे तुझ्या निर्लज्जपणाला...
झालास कसा हैवान तू
येवून माणूस जन्माला...
गायकवाड आर.जी.दापकेकर
9834298315
