जातीअंत
जातीअंत
जातीवंत
" पुष्पाग्रज "
आरे 'जात' काय विचारता
मी ही माणूसच आहे
मानवतेचा पुजारी मी
बोल आजून काय हवे?
तुझा माझा धर्म एकच
फक्त मानवतेचा ,
ना जात मानतो मी
ना कोणत्या धर्माचा...
सत्य मला हवे
हवी मला समता ,
समतेचा पाईक बनुनी
मी घालविन विषमता.
तुझे माझे आहे फक्त
बंधुत्वाचेच नाते,
या मातेची सारी लेकरे
गाऊ या राष्ट्रगिते.
एकतेची मशाल घेऊन
गित नवे गाऊ,
सोडून देऊ सारे भेदभाव
सारेच भाऊ भाऊ.
भेदभाव ते सोडून देऊ
वाढवू देशाची शान,
रक्षण करण्या भारतमातेचे
देऊ या हा प्राण.
जातीअंताच्या लढाईत
व्हा रे सामिल तुम्ही,
परिवर्तनाचा ध्यास मज
परिवर्तन घडवू आम्ही...!
गायकवाड रविंद्र गोविंदराव,दापकेकर
जि.नांदेड
