कर कल्याण सर्वांचं
कर कल्याण सर्वांचं
कर कल्याण सर्वांच "पुष्पाग्रज" हे गणराया तुला मागणे,मागते मी एकच दूर करूनी विघ्ने सारी,कर कल्याण तू सर्वांच... शेतं पिकू दे भरभरूनी घर भरु दे धान्यानं , ओला कोरडा नको दुष्काळ सारे नाचू दे आनंदानं रोगराई नको आपत्ती,नको ते संकट कसलच... नको मुळी तो भेदभाव बंधुभाव तो हवा इथं, मानवता हवी माणसात मानवतेचे गाऊ गित. अवघा भारत एक असू दे,नाव होऊ दे भारताचं... हिंसा,दंगे,संप,मोर्चे नको,हवा सर्वांना न्याय, गरिबी,बेकारी,महागाईवर तुच करावा तो उपाय दुःख,दैन्य करुनी दूर तू कर सुखी जीवन आमचं... वैर मनिचे दूर होऊ दे मनात असू दे सद्भाव, सदाचार तो अंगी बानु दे जडू दे तुझ्यावर जीव तुझ्याक्रुपेने सदा असु दे भविष्य उज्वल सर्वांच... स्वार्थ,भ्रष्टाचार,आतंकवादही थांबव सारं तुच आता, राष्ट्रहितार्थ,जनहितार्थ सदबुध्दी तू दे बाप्पा . मार्ग दाव तू भला आम्हाला रक्षण कर तू सर्वांचं... व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत घडवूया सारे आम्ही स्त्री भ्रुणहत्या,बालविवाह रोखू अत्याचार आम्ही. तुच पावन हो गणेशा पतन कर तू दुष्टांच.... गायकवाड आर.जी.दापकेकर
