देवा गजानना..
देवा गजानना..
वाट तुझी पहात होतो
देवा गजानना
झाले आगमन तुझे
झाला
आनंद आम्हा..
ढोल ताशाच्या गजरात
गुलाल उधळीत
नाचू गाऊ आनंदाने
केले तुझे स्वागत
जयघोष करतो तुझा
आनंद मावेना...
रोज तुझी पुजाअर्चा
रोज तुझीच आरती
कृपा तुझी असो देवा
सदा आम्हा वरती
तुझ्यावर भक्ती देवा
तुच तार अम्हा...
आनंदाने नाचू गाऊ
तुझा जयघोष,
तुझ्या आगमनाची
आस आम्हास
करुन विसर्जन
देतो निरोप तुम्हा...
