कोणी नसतं कोणाचं
कोणी नसतं कोणाचं
: माणूस मरतो म्हणजे काय
तो दुसऱ्या जगात जातो,
तिथे असतं कोणी त्याचं
पुन्हा कधी न येतो...
आधी गेले सोडून त्याला
त्यांच्यावर प्रेम करणारे,
आठवणीत त्या झुरतो सदा
मन असते झुरणारे
अतुर होऊन भेटीस त्यांच्या
निरोप जगाचा घेतो,
भेटीसाठी त्या प्रिय जनांच्या
ही दुनिया सोडून जातो.
आपलं सुध्दा असतं कोणी
त्या वेगळ्या दुनियेत,
येतं बोलणं त्यांचं तेव्हा
जावंच लागतं तिथं.
सोडून च जायचं तर
कमवून नाव जा,
किर्ती तुझी असावी
आठवणीत रहा सदा.
दुःख नसावं जाण्याचं
पण सार्थक व्हावं जीवनाचं,
हैवान नको होऊस
जप नातं माणसाचं.
मरुन ही उरता येतं
किर्ती रुपी माणसाला,
नांव व्हावं मोठं
म्हणूनच
देवाने जन्म दिला..
नाही मिळणार जन्म हा पुन्हा
एवढं ध्यानी धरायचंयं,
माणसासारखे वागा जगा
प्रत्येकालाच मरायचयं...
मरणाची नको भिती
भलं करावं जगाचं
जाणं आहे एके दिवसी
सो
डून सारं च स्वार्थाचं...
फिटणारे नसतातच
समाजाचे
या ॠण
मेल्यावर ही
लागतातच चार जण...
असं काही करुन जावं
नको दुःख मरणाचं,
स्वार्थीपणा सोड मानवा
कोणी नसतं कुणाचं...
गायकवाड आर.जी.दापकेकर
