आई तुझी आरती...
आई तुझी आरती...
आई तुझी आरती..
झिजविला देह
माझ्या आईनं,
आई तुझी रोज
किर्ती, आरती गाईन..
मिळेल का आता आई
तुझी आम्हा माया?
गेलीस सोडून कशी
तुझ्या लेकरांना या
येते क्षणोक्षणी मला तुझी आठवण...१
कुठे शोधू तुला आई ?
कुठे तुला पाहू ?
डोळ्यातून तुझ्यासाठी
अश्रू लागले वाहू.
जन्म भर फिटणार नाहीत
आई तुझे ॠण...२
कसा त्या देवाने
घात आई केला,
मांडीवर माझ्या तू
प्राण सोडिला.
उगवला कसा ग
तो काळा दिन...३
गेलीस कशी आई
सोडून तु मला ?
नाही आली दया कशी
दुष्ट त्या देवाला ?
आई ,आई करतो
हा जीव रात्रंदिन...४
जिथं तिथं दिसे
मज आई तुझे रूप,
सांगू कुणा कसं
मज दुःख झाले खूप,
हरवलं माझं सारं
तन, मन, धन...
गायकवाड रवींद्र गोविंदराव
दापकेकर..
९८३४२९८३१५
कुठे शोधू आई..
आठवण तुझी येते
कंठ दाटून आला,
सांग कुठे आई
शोधू मी तुला...
ना खाल्ली,पिलीस
का आम्हावर रुसलीस,
का गेलीस सोडून
काय मी गुन्हा केला?
कशी वेळ आली
नाही तुझी सावली,
जगावं कसं तुजवीण
आई कळेना मला...
कुठे शोधू, कुठे पाहू
अश्रू मी किती वाहू,
जन्म भर हवी होतीस
आई तू मला...
जन्मोजन्मी मला
हवीस तू आई,
तुझ्याच पोटी आई
हवा जन्म मला...
मागतो मी क्षमा आई
चुकलं असेल तर काही,
नाही तुझा देवाने
त्या
न्याय ग केला...
झुरतो माझा जीव
पावला नाही देव,
सांग कसा भजू
मी
कोणत्या देवाला..
.
कोसळला डोंगर
दुःख झाले फार,
लागली ही धार
माझ्या डोळ्याला..
गायकवाड रवींद्र गोविंदराव
दापकेकर ९८३४२९८३१५
