नाही दुसरे दैवत...
नाही दुसरे दैवत...
आईबापावीन जगात या
नाही दुसरं दैवत,
सेवा करावी आईबापाची
ठेवा त्यांना सुखात...
आईबापांवीन जगात आपलं
नाही दुसरं कोणी,
जन्म देवूनी दुनिया दावली
केलं किती रे त्यांनी...
त्यांच्या मुळेच हा जन्म लाभला
आलोय ह्या जगात...
खाऊन खस्ता मोठं लहानाचं केलं आईबापांनंं,
सात जन्म ही फिटणार नाहीत आईबापाचे ऋण
आपल्यासाठीच देह झिजविला
आटविले रगत...
आईबापांच्या ऋणाची
ठेवूनिया जाणं,
मोठे होऊन आईबापांचे स्वप्न करावे पूर्ण
ठेवा जाणं करा जीवन त्यांचे सार्थक...
आईबापांच्या चरणांवरती
सदा ठेवावा माथा,
विसरू नका रे कधीच कोणी
त्यांची जीवनगाथा
वाटावा अभिमान त्यांना असे एक व्हा लाखात...
गायकवाड आर.जी.दापकेकर
