STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

विसरू नका उपकार

विसरू नका उपकार

1 min
1

विसरू नका उपकार...

     '. पुष्पाग्रज. '


जपून ठेवा रे खांदेकरी चार 
विसरू नका कधी कोणाचे उपकार.

गणगोत, भाव भावकी 
हवी सुखदुःखात,
दुखत असेल किती जरी 
कोणाच्या पोटात.
प्रत्येकाने च करावा थोडा उद्याचा विचार...

आलं तसं जाणं 
आहे प्रत्येकाला,
रिकामेच जाणं येणं 
कोण संगे काय नेला.
करा भलं थोड 
ठेऊनिया जात
यावी आठवण 
असे करा काही ॠण
कार्य असावे महान व्हावा जीवनोध्दार...

कर्म येते संगे
उरते फक्त नाव,
दया दान धर्म 
नको स्वार्थ हाव
जीवनात कर्म 
विचार हवे सत्संग
सुखदुःखाचा मेळ
आहे जीवन रंगारंग 
माणुसकी माणूसपण पाळा शिष्टाचार...

नको रडगाणे 
जगा हसून जीणे 
सुखदुःखात इतरांच्या 
धावून हवे जाणे
शब्दात गोडवा 
वागणे माणुसकीचे
जपून ठेवा सारे
सार जीवनाचे 
स्वाभिमान जपावा नका होऊ लाचार...

गायकवाड आर.जी.दापकेकर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract