STORYMIRROR

Sonam Thakur

Abstract Others

4  

Sonam Thakur

Abstract Others

तगमग

तगमग

1 min
224

उमजे ना काही मला

सुटे ना प्रश्न जीवना

मृगजळा मागे धावून

साध्य काय होइल मना

गणित हे आयुष्याचं

सुटता सुटत नाही

समोरचे मार्ग सारे

धुरकट दिसत राही

स्वप्न उराशी बाळगून

अजून किती फिरशील

धरून खोट्या आशा

किती दिवस झुरशील

कुठवर धावपळ ही

करणार तू मना

तगमग ही जीवाची

थांबव ना रे आता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract