घुसमट
घुसमट
1 min
252
श्रमले फार जीवनात
अडथळे आले मार्गात
स्वतःला सिद्ध करण्यास
मेहनत ही केली अपार
काळ,प्रसंग काही न पाहिले
अपमान सारे सहन केले
साहित्यसेवेसाठी फक्त
सुसाट धावत मी राहिले
केली कसलीच ना अपेक्षा
इतरांसाठी झिजवली काया
मानवतेच्या सेवेसाठी
झोकून दिले स्वतःला
घुसमट ही जीवास जाळी
निराशा ही पदरी आली
कर्तृत्वाची माझ्या इथे
कधीच ना कदर झाली