वृक्ष संवर्धन
वृक्ष संवर्धन


लहानपणी वाचले होते
वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे
आता मात्र मनास पटते
महत्व त्याचे खरे
वृक्ष म्हणजे पशु-पक्ष्यांचा अधिवास
थकलेल्या जीवांना मिळे सावली खास
जमे गप्पांचा फड याच वृक्षाखाली
वड पूजिती इथेच सौभाग्यवती
हा नसे फक्त वृक्ष
हा तर थोर कल्पवृक्ष
याचा प्रत्येक भाग असे उपयोगी
आयुर्वेद ही सांगती वृक्षाची महती
फळ झाडांची असे गोष्टच निराळी
भोवती जमती त्याच्या लाहान थोर मंडळी
फुलझाडांचे महत्व वेगळे
त्यांच्या फुलांनी सजती देऊळ आणि लग्न सोहळे
वृक्ष नसतील तर होईल पृथ्वी भकास
ना पडेल पाऊस ना मिळेल अन्नाचा घास
चला करूया मिळून संवर्धन या वृक्षांचे
हेच तर आहेत आधार आपल्या जीवनाचे