बाबा
बाबा
रामराज्य आणि नंदाचं गोकुळ
एकाचवेळी पाहायला मिळालं
अश्या सुंदर कुटूंबात मला
ज्ञानामृताचे बाळकडू मिळालं
रामराव आणि लीला
जणू वासुदेव देवकी
त्यांच्या घरी जन्मले
माझे बाबा उत्तम तिथी
समजूतदार आज्ञाधारक
आहेत खूपचं हुशार
जिद्दीने अन मेहनतीने
सांभाळतात परिवार
व्यावसायाने वकील असले जरी
समाजहिताची जवाबदारी
करतात उत्तमरीत्या पुरी
माणुसकीची जाणीव त्यांनाचं खर
ी
सर्वसामान्यांना मोफत देतात सल्ला
न घेता कुठलाही मोबदला
वडील म्हणून आहेत ते खूपचं महान
मुली असलो तरी देतात वागणूक मुला समान
उणीव कधी कुठली भासू दिली नाही
कमतरता कशाची होऊ दिली नाही
शिक्षणाचे हट्ट सारे केले आमचे पुरे
माझ्या आयुष्यातील तेच हिरो खरे
माझे आणि बाबांचे नाते अजोड
जगात त्याला कसलीच नाही तोड
हात त्यांचा कायम डोईवर असावा
आशिर्वाद त्यांचा नेहमीच पाठीशी असावा