सोनूला भरोसा नाय
सोनूला भरोसा नाय
गप्प शांत बसले तर
सारखं आपलं झालंय काय
घाव स्वतःच देऊन
वर म्हणतात सोनू तुला
माझ्यावर भरोसा नाय काय
समजवण्यात यांना
पूर्ण आठवडा जाय
वरून हेच पुन्हा
विचारणार सोनू तुला
माझ्यावर भरोसा नाय काय
काम सगळं सांभाळून
रोज रोज यांच्यासाठी
करते नवीन पदार्थ ट्राय
तरीपण म्हणे सोनू तुला
माझ्यावर भरोसा नाय काय
हे वाक्य सतत ऐकून
सोनू कंटाळून जाय
माघारी फिरून एकदाच
बोलते सोनूला आता
भरोसा नाय
