अनंतझेप
अनंतझेप
पुरे झाला चिखलफेक
झाला पुरे अत्याचार
विजलेल्या राखेतून या
आज पुन्हा पेटला अंगार
शांत आहे तोवर ठीक
वाकड्यात तुम्ही जाऊ नका
माझी पंख छाटण्याचा
चुकूनही प्रयत्न करू नका
हट्टाला पेटणारी आमची
जात आहे क्षत्रिय-भंडारी
उगीच येऊ नका आडवं
होईल सावरणं भारी
परिस्थितीशी झुंज देणं
वसईच्या मातीनं शिकवलं
घारीसम अनंतझेप घ्यायला
वारसा हक्कातून लाभलं
