अधुरी एक कहाणी
अधुरी एक कहाणी
तू अडकलास कर्तव्यात
मला अडकवले बंधनात
का कुणी समजलं नाही
भावना ज्या होत्या मनात
जीवापाड प्रेम असूनही
दिली नाही कोणीच साथ
अडथळे आले किती तरी
पण सोडला ना तुझा हाथ
किती अन का सोसायचं
अजून का शांत राहायचं
स्वार्थी या समाजापायी
आपण का मन मारायचं
दिसे ना मजला वाट
व्याकुळला माझा जीव
सुख असता सर्वत्र
जाणवे तुझी उणीव
विरहात तुझ्या सख्या
झाले मी अधीर
जाणीव आहे परिस्थितीची
पण सुटतो आता धीर