वदली लेखणी
वदली लेखणी
शाब्दिक धन असता
मुक्त व्यक्त होत राहायचं
मनात काही न ठेवता
कागदावर सारं उतरवायचं
शत्रूंना जिव्हारी बोचणारी
ताकद असावी शब्दांची
झप झप करती वार पाहा
समशेरस्वरूपी लेखणी
असता सरस्वतीचे वरदहस्त
उगीचच कशाला भ्यायचे
हाती शब्दांचे शस्त्र असता
उगीचच कशाला भांडायचे