निरोप
निरोप


सुख जरासे शोधाया
धडपड केली जीवाची
माझ्या स्वाभिमानाच्या
उडल्या चिंधड्या
देवा तुझ्याच भूमिपाशी
जीवाची झाली अव्हेलना
अपमान पचवले पदोपदी
विषाचे प्याले प्राशन करूनही
पायरी यशाची गाठलीच नाही
भुईसपाट होऊनि अनेकदा
शून्यातून उभारले विश्व मी
नियतीचा फटका असा पडला
आता सोडून जाते
तुमच्या स्वाधीन मौदान मी
आश्रित मी या भूतलावर
कार्य माझे संपवते
आशीर्वाद असुद्या तुमचा
निरोप सर्वांचा आता घेते
येईल जेव्हा आठवण माझी
चारोळी एखादी लिहा
होती एक वेडी कवयित्री
स्मरणी कायम ठेवा