परतीची पानगळ...
परतीची पानगळ...
पानगळ तीही
जरा स्तब्ध होती
पावले तुझी जेव्हा
मागे परतली होती
पायाशी पातेही
तीक्ष्ण शूल झाली
पाण्यात निखारे
जेव्हा पेटली होती
हात तुझा निसरडा
असा दूर झाला मग
कोरड्या अश्रूस वाट
तेव्हा मोकळी होती
मी पाठमोरी तेव्हा
निःशब्द तिथे होतो
तू सोडून मला दूर
जेव्हा गेली होती
साथ सोबतीची
देण्यास मज होती
पण एकटे सोडून तू
का मागे परतली होती?

