सक्सेस म्हणजे काय?
सक्सेस म्हणजे काय?
सक्सेस म्हणजे फक्त यश नव्हे
पोरखेळ तो खेळ नव्हे
प्रयत्नाचा हा मेळ नव्हे
तुझ्यातील विश्वासांचा
निसटणारा तो वेळ नव्हे
सक्सेस म्हणजे शब्द नव्हे
दाटूलेला कंठ नव्हे
रडका तो बंध नव्हे
चिमलेल्या फुलातला
विरलेला गंध नव्हे
सक्सेस म्हणजे पराक्रमी शौर्य नव्हे
राखून ठेवलेले धैर्य नव्हे
सरून गेलेले पर्व नव्हे
निधडया छातीवर
पेललेला खोटा गर्व नव्हे
सक्सेस म्हणजे हिम्मत नव्हे
दोस्तीतील गंम्मतही नव्हे
घामेजलेली मेहनत नव्हे
पैश्यात मोजता येणारी
बाजारी किंमतही नव्हे
तर...
सक्सेस म्हणजे एक असे यश
जे तुझ्या हास्यात टिकणारं
मनाच्या ओठावर उमटून
प्रेमाच्या आरश्यात दिसणारं...
