का परत मग....
का परत मग....
नको ना आता तो दिलासा
नको ना परत तो छंद तुझा
आठवणीच्या पाकळ्यांचा आता
नको तो परत सुगंध तुझा
मन खुप पुढं गेलंय आज
नको तो आता भास तुझा
विरलेत आता आसवे सारी
नको ना आता ध्यास तुझा
उशीर झालाय पावलांना
माघारी फिरण्यास पुन्हा
ना चुक तुझी होती ही
ना तो होता माझा गुन्हा
कुठवर शोधशील आसवे
कुठे ठेवशील तो शब्द सूना
एकमेका बघण्या पलीकडे आता
नाही उरलाय तो बंध जुना
सोड धागे आपल्यात गुंतलेले
कधीच नसलेल्या प्रेमाचे
साथ इथवरच असेल ही
चल घेऊया वळणे निरोपाचे
आता फक्त एक कर...
आता फक्त एक कर...
उधळून दे तिच्यावर
ओंजळ तुझ्या प्रेमाची
नको शोधू डोळ्यात तिच्या
आस माझ्या असण्याची

