स्वच्छंदी पंख...
स्वच्छंदी पंख...
आवडे मला तीच
सोनं पाखरे जपायला
हलकेच त्यांच्यातल्या
भरारी सवे उडायला
त्यांची पंखे अशी
मोहक आयुष्याची
स्वप्नात भासे जशी
कवेतुन आसमंताची
गोड बापडी तीही
उंच ती सामर्थ्यपणी
कशी आकाशाला ते
घेत असे गवसनी ?
वाटे बहु मजला मग
लेखनी अशीच व्हावी
मोकळी अभिवक्त होत
उंच झेप तीने घ्यावी
स्वच्छंदी पंखाला तिने
भिरकावून क्षितिजावरी
घेऊनी स्वार घिरट्यात
शब्दांच्या त्या नभावरी
आणावे खेचूनी मग
स्वरगंधातील वर्णाला
अन वेचावे त्याहुनी
मालेतील शब्दपुष्पाला
क्षमतेचे विचार जुने
सोडावे माघारी वळणावर
नव्या उमेदीच्या त्या
प्रत्येक नव्या बळावर
