STORYMIRROR

पद्मवैखरी ठाकरे

Inspirational Others

3  

पद्मवैखरी ठाकरे

Inspirational Others

तुझेच स्वागत

तुझेच स्वागत

1 min
207

लेक दीपातील ज्योतकरी

प्रकाशाचे धृतासवे आगत्य

जन्मता संस्कार आकलन

उपज मिळे स्त्रीस वरदान


छत्र माता पित्याचे अधरी

गुंफुन संयमाच्या झालरी

दृढनिश्चय असावा मनीचा

अपयशावर मात यशाचा


स्वप्नीचे रंग गर्द जरीचा

वास्तव्यात क्षणक्षण कसोटीचा

यातच जगण्याची उभारी

जीवनाची साफल्य ललकारी


ऊन पावसाचे भावतरंग

सुखदुःखाचे शोधी अंतरंग

होईल आकाश निरभ्र

मिळेल जन्माचे सार


जन्मदिनी करी गुंफन शब्दकणांची

आशिष निरोग काया मनी इंद्रियांची

लाभो यशकिर्ती सन्मान आयुष्याची

हीच शुभेच्छा तुला अंतरीची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational