अमर माझे काव्य ..
अमर माझे काव्य ..
1 min
154
मी जरी नसले धरेवर
माझे काव्य अमर असेल
त्याच्या शब्दांना नव्याने
परत जन्म प्रखर मिळेल
सोबतीची इच्छा जरी
त्याची महती थोर असेल
अनादुनही टिकणारे ते
माझे काव्यविभोर असेल
माझ्या प्रत्येक शब्दाला
नव्याने देणारा श्वास असेल
त्याही विश्वात नेहमीच तो
जगण्याचा ध्यास असेल
जरी मी झाले विलीन नभी
गुंजीत त्याचे वर्ण असेल
माझ्या प्रत्येक लेखणीचे
मनावरील ते व्रण असेल
एक असेच माझे काव्य
मोक्षाचे सामर्थ्य असेल
अनंतात त्याचे स्वर अन्
मर्मात त्याचा अर्थ असेल
