जगत जननी...
जगत जननी...
जगत जननी तूच गं आमची
तूच विसरली का स्वतःला
का डावलते आजही तू?
का दोष देतेस जीवनाला ?
तूच आहे खरी विश्वविधाती
जन्म देतेस तूच नव श्वासाला
तूच करसी ही या सृष्टीची रचना
करते तरी स्वतःचीच अवहेलना
नको शोधूस कुठे आधार
नको मागुस कुणा आसरा
हिमतीने दे लढा आज पुन्हा
जागू दे तुझ्यातील मग त्रिपुरा
काय म्हणतील जग हे मजला
विचार काय म्हणुनी तू करावा
यातना तु सोसताना कान्ता
आले होते का कोणी ते सोसाया
संचारू दे पुन्हा तुझी नवशक्ती
झिडकारून दे ते पाप या क्षणी
जागव तुझ्यातील चैतन्यज्वाला
तूच तर जन्माची युद्धकांक्षिणी
