सावधान मी...
सावधान मी...
येणाऱ्या प्रत्येक लढाईस
लढण्या सावधान मी
घेऊन सामर्थ्याचे शस्त्र
अन झाले सज्ज मी
येणाऱ्या प्रत्येक लढाईस...
पेलण्या असंख्य कर्तव्ये
सदोदित असे तत्पर मी
सावरण्या सर्व संकटे
जाईल रोखुन सामोरे मी
येणाऱ्या प्रत्येक लढाईस...
किती घेशील तु परीक्षा
माझ्यातल्या निश्चयाची
तुझ्या सगळ्या आव्हानास
तेव्हा मात देईलही मी
येणाऱ्या प्रत्येक लढाईस...
येऊ दे आता दुष्काळ
सर्व अश्या सुखाचा
दु:खाच्या प्रत्येक चेंडूवर
मारणार षटकार मी
येणाऱ्या प्रत्येक लढाईस...
नको करुस चिंता तु
माझ्या हरण्याची नशीबा
गाशिल पोवाडा तुच
जेव्हा होईल विजयी मी
येणाऱ्या प्रत्येक लढाईस...
लाख आले आजवर
तु तो नवखा ना कुणी
लक्षात असू दे हे नाव
भेटेल तुज परत नव्याने मी
येणाऱ्या प्रत्येक लढाईस...
