STORYMIRROR

Sunjay Dobade

Fantasy

3  

Sunjay Dobade

Fantasy

अविनाशी डोळे

अविनाशी डोळे

1 min
24.3K


मी मावळतीच्या सूर्यासोबत

चालून गेलो काही अंतर

हसून त्यास दिला निरोप

"भेटू" म्हणालो "उद्या पूर्वेला"


अहंकाराने सूर्य म्हणाला,

"मानवाचा काय भरवसा?

तू आज आहेस उद्या नाहीस. "


मीही तितक्याच तोऱ्यात म्हणालो,

"तू सुद्धा अविनाशी नाहीस.

तरी तू का करतोस गमजा? "


"माझी दुर्दम्य इच्छा आणि

जगण्याची अविरत धडपड

ठेवील मला जिवंत!

मी उद्या नसेन कदाचित

पण जाताना देऊन जाईन

माझे दोन्ही अविनाशी डोळे

आणि पुन्हा बघेन तुजला

नव आशेच्या उगवतीकडे!"


सूर्य रागाने लाल झाला

आणि शरमेने बुडाला

क्षितिजाच्या पल्याड...


अजून किती काळ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy