प्रियसी.....
प्रियसी.....
मला कधी न कळले.....
की तू आहे म्हणून मी आहे ...
की मी आहे म्हणून तू आहे...
जसे सावली असली की झाड असते....
तसेच त्याच झाडाखाली सावली असते...
हे प्रेम असच असते...
एकमेकांना आधार देत असते....
तू वेड लावते मला की....
मी वेड लावते तुला...
हेच न कडले मला....
कधी पासून बघतोय तुला...
तरी अस वाटते आज च बघितलय तुला...
तू सोबत असतां ना मनाला खूप छान भासतो.....
जसे उन्हाने तापलेल्या माणसाला विसावा झाड देतो...
या प्रेमाच्या नात्यातील गणिताचे...
उत्तर देते का तू मला??
सांग ना ग प्रिये आयुष्यातील ...
प्रेमामध्ये गुणाकार सारखे जुळशिल का मला....

