STORYMIRROR

UMA PATIL

Romance

4  

UMA PATIL

Romance

राजसा राजसा ( गझल )

राजसा राजसा ( गझल )

1 min
21.5K


रोज न्याहाळतो, राजसा राजसा

अन् मला भाळतो, राजसा राजसा



भेट होता कधी, भारलेल्या क्षणी

आसवे गाळतो, राजसा राजसा



देतसे प्रेम तो, घेतसे प्रेम तो

प्रेम ते पाळतो, राजसा राजसा



तो सुगंधी नशा, मी गुलाबी कळी

रात्र गंधाळतो, राजसा राजसा



ठाव नाही कुणा, प्रेम हे आमचे

राज सांभाळतो, राजसा राजसा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance