STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance

4  

SANJAY SALVI

Romance

त्या वळणावर …

त्या वळणावर …

1 min
23.4K


त्या वळणावर तुला पाहिले मागे वळूनी बघताना

पाहिलेस तू मला तरी पण कळले नाही इतरांना

त्या वळणावर ….


भिरभिरणाऱ्या वाऱ्यासंगे पदर साडीचा उडताना

फरफरनाऱ्या पदरा आढून हळूच चोरून बघताना

त्या वळणावर …


त्या वळणावर वाट पाहतो मनात काही नसताना

असी पाउले अडखळली जसी वाट चिकटली पायांना

त्या वळणावर …


तसा अचानक खिळून गेलो मागे वळूनी पाहताना

येशीलच तू वाटत होते मनाशी हितगुज करताना

त्या वळणावर …


त्या वळणावर वळण लागले तुझ्या न माझ्या जगण्याला

भेटत गेलो वरच्या वरती कारण काही नसताना

त्या वळणावर …


फुलून आली प्रीत आपुली अश्याच भेटी घडताना

एकरूप मग होवून गेलो जीवन गाणे गाताना

त्या वळणावर …


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance