STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

2  

SANJAY SALVI

Others

रेशमी बंध

रेशमी बंध

1 min
274


सागरात मिसळल्या लाटा,

डोहात विरती तरंग,

उसळता धुळीचे लोट,

पायात  अडकली वाट,

मेधात अडकल्या धारा,

डोंगरात फिरला वारा ,

पसरता धुक्याच्या थर ,

लीम्पिले दरीचे दार,

फुलांत बहरला गंध,

पाकळ्यास लाभला रंग,

मिटतात पाकळ्या अंग,

भ्रमरास करून बेधुन्ध,

असे अडकणे कुणा न चुकले,

मिठीत फासणे कुणा न चुकले,

हे बंध रेशमी रेशीम गाठी,

जपून ठेवीन आठवणीन साठी.


Rate this content
Log in