रेशमी सकाळ
रेशमी सकाळ
1 min
959
रेशमी धुक्याची दुलई ओढून
तळे होते पहुडलेले,
चमचमत्या दवाचे थेंब पानावर लेवून
झाड होते सजलेले,
कोकिळेच्या सुरांनीही दुलई नाही विस्कटली,
मग रान-टिटवी तळ्यावरून उडताना टिवटिवली,
पायवाटा जागल्या विविध पाऊलखुणांनी,
आकाश भरून गेले रंगीबिरंगी पाखरांनी,
झुळझुळ वारा पसरला गर्द हिरव्या रानातून,
खुळखुळ पाणी वाहे नागमोडी ओढ्यातून,
रवी किरणे धरतीवर येता धुकेही वितळले,
वाऱ्यासंगे ओढ्यातून दूर दूर पसरले...!!!
