देवा आज तू सांग रे मला,
देवा आज तू सांग रे मला,
1 min
468
देवा आज तू सांग रे मला,
का असे हे जग वाकडे,
कोणी भांडे तर कोणी ओरडे,
का असे हे घडते सlरे,
देवा आज तू सांग रे मला,
आपुलकीचा स्पर्ष ना उरला,
मायेचा ओलावा सरला,
लोभही आता लोप पावला,
भरला घड़ा रीता जाहला,
देवा आज तू सांग रे मला,
खोट्या शपथा खोटी वचने,
स्वार्थ सiधान्या मृदु बोलने,
पाठीमागुन सूरा खुपसने,
येथी आता असेच घड़ने,
देवा आज तू सांग रे मला,
पाप पुण्याचा हिसाब चुकला,
पुन्यiईचा जोर ना उरला,
प्रत्येकाने स्वार्थ साधला,
तुझाच रे बाजार मांडला,
देवा आज तू सांग रे मला
