STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

3  

SANJAY SALVI

Others

प्रेमाचा ओलावा

प्रेमाचा ओलावा

1 min
213

जांभूळ पिकलं आंबा  मोहरलं,

रान वन कस गंधान भरलं ,

हिरवी करंद काळीभोर झाली,

एकच चाखता जिभेवर लाली,

म्येनेन राघूच्या कानी सांगितलं,

गुपित मायेनेच्या पोटी दडलेलं,

गुपित एकता  राघुही खुलला,

शिळ वाजवीत रानी तो फिरला,

ओडयात डोहात वन्य जन येती,

शीतल पाण्यात अंग घुसलती,

शाळेच्या सुट्टीत नात-नातू येती,

नदीच्या पाण्यात खेळ ती खेळती,

मायेचा गारवा आंब्याचा गोडवा,

आज्जीच्या कुशीत प्रेमाचा ओलावा,

आज्जीच्या कुशीत प्रेमाचा ओलावा,



Rate this content
Log in