STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance

3  

SANJAY SALVI

Romance

शृंगार

शृंगार

1 min
506

आज होईल बरसात चांदण्याची,

पाटी होईल कोरी आकाशाची,

अन् रेखाटेन सुंदर तसबीर तुझी आभाळावर,

कलेची नाजूक चंद्रकोर लावेन कपाळावर,

ढगांची मलमल ल्यायला अंग,

त्यावर सजतील इंद्रधनुचे रंग,

उषेची लाली चढेल तुझ्या गाली,

निशेची बारीक रेघ टपोर डोळी,

केसांमध्ये माळेन काजव्यांची चमचमती वेणी,

भांगामध्ये मधोमध लखलखती सौदामिनी,

दवाच्या थेंबांची होतील कर्णफुले,

मग सूर्यही झाकोळून जाईल तुझ्यामुळे,

बघ न प्रिये तोही ढगाआड गेलाय,

त्यालाही कळलंय मी तुझा साज-शृंगार केलाय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance