STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

3  

SANJAY SALVI

Others

आला आला हो पाऊस

आला आला हो पाऊस

1 min
87

आला आला हो पाऊस,

माती न्हाती धुती झाली,

थेंब टपोरे पडता,

माती सुगंधित झाली।।

आल्या सरीवर सरी,

वारा सोसाट्याचा भारी,

शीळ घालत तो आला,

माझ्या अंगणी शिवारी ।।

उडला हो धुरळा,

फेर वाऱ्याने धरला,

मळा भिजता पाण्याने,

बळीराजा आनंदला ।।

पाने फुले ती डोलती,

वाऱ्या सांगे ती झुलती,

टपटप तालावर,

वेली वरखाली होती।।

चिल्ली पिल्ली आनंदली,

अंगणात ओली झाली,

माय बापुडी दाराशी,

पाहुनीया सुखावली ।।

आला आला हो पाऊस,

अव्हगी धरा तृप्त झाली,

मातीच्या कोंदणात,

बीज होण्या विसावली।।


Rate this content
Log in