STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance Others

3  

SANJAY SALVI

Romance Others

प्रेम म्हणजे काय असत ....?

प्रेम म्हणजे काय असत ....?

1 min
664

प्रेम म्हणजे काय असत ?,

ते केल्यावरच कळत,

त्याला कोणतच बंधन नसत,

म्हणूनच ते प्रेम असत,

प्रेम म्हणजे जिव्हाळा, आतुरता,

विश्वास, समर्पण आणि आपुलकी,

त्याला शब्दांची गरज नसते,

फक्त ओली नजर लागते,

कधी हवा असतो कान,

मन मोकळ करण्यासाठी,

तर कधी खान्धा ... विसावण्यासाठी,

कधी हवा हातात हात ... शाश्वत आधारासाठी,

आणि कधीतरी दोन बोटे ओल्या डोळ्यांच्या कडा पुसण्यासाठी,

प्रेम म्हणजे केवळ प्रेम असत,

त्याला कोणतच बंधन नसत,

म्हणूनच ते प्रेम असत.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance